UdyogNews.in

पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज

बुधवार, पुणे
ब्रेकिंग न्यूज

पुणे आणि PCMC औद्योगिक पट्ट्यातील घडामोडींचे एकमेव डिजिटल व्यासपीठ!

चाकण, भोसरी, एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक कामगार, अधिकारी आणि उद्योजकाचा हक्काचा सोबती. आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्याची धडधड आता एकाच क्लिकवर.

लोकल जाहिराती

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांचा पर्यावरणीय संघर्ष तीव्र; माळशेज-मोरांडे पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून आंदोलन

पुणे | उद्योगन्यूज विशेष पुणे जिल्ह्यात मोठ्या पायाभूत आणि ऊर्जा प्रकल्पांची संख्या वाढत असताना त्यांचे...

ताज्या घडामोडी

अपघातमुक्तीसाठी रांजणगावातील तज्ज्ञ मार्गदर्शनातून पुण्यासाठी महत्त्वाचा सुरक्षा संदेश, #DISH

रांजणगावातील या उपक्रमातून पुणे जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा संदेश समोर येतो—औद्योगिक क्षेत्रातील अपघात...

📰 आजची मुख्य बातमी

उद्योजकांसाठी ‘वन-स्टॉप’ दिलासा! पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण कक्ष व MAITRI Cell कार्यान्वित !DISH Pune

दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी उद्योजकांच्या समस्यांवर विशेष सुनावणी; पहिल्याच बैठकीत १३४ प्रलंबित तक्रारींचा आढावा

पुणे | UdyogNews.in प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील उद्योजकांना विविध शासकीय विभागांच्या कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करण्याची वेळ कमी व्हावी आणि उद्योगाशी संबंधित प्रलंबित समस्या अधिक प्रभावीपणे मार्गी लागाव्यात, यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयात आता Industry Grievance Redressal Cell आणि MAITRI Cell कार्यान्वित करण्यात आला असून, उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर ‘Single Point Co-ordination & Facilitation’ यंत्रणा उभारण्यात आली आहे.

या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली आढावा बैठक पार पडली. बैठकीत विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या तब्बल १३४ तक्रारींचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.

१३४ तक्रारींचा पहिल्याच बैठकीत आढावा

उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध शासकीय विभागांकडे उद्योजकांच्या अनेक समस्या व प्रकरणे प्रलंबित असल्याचे या बैठकीत समोर आले. विभागनिहाय आकडेवारीनुसार सध्या प्रलंबित तक्रारींची संख्या पुढीलप्रमाणे आहे—

  • औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय –
  • उद्योग संचालनालय –
  • ऊर्जा विभाग –
  • राज्य उत्पादन शुल्क विभाग –
  • वैधमापन शास्त्र विभाग – १३
  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संबंधित – १०९

या सर्व तक्रारींची विभागनिहाय वर्गवारी करून संबंधित विभागांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार असून, जिल्हास्तरावर त्यांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.

आता महिन्यातून दोनदा ‘उद्योजक सुनावणी’

या नव्या व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे उद्योजकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

या बैठकीत संबंधित औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक आणि ज्या विभागाशी तक्रार संबंधित आहे त्या विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे केवळ तक्रार स्वीकारण्याऐवजी संबंधित अधिकारी आणि उद्योजकांसमोर प्रकरणाची चर्चा करून पुढील कार्यवाही निश्चित करण्याचा प्रयत्न होणार आहे.

‘एका कार्यालयातून अनेक विभागांशी समन्वय’

उद्योजकांना उद्योग विभाग, DISH, कामगार, ऊर्जा, उत्पादन शुल्क, वैधमापन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे किंवा इतर विभागांशी संबंधित समस्या असल्यास वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयातील या यंत्रणेमार्फत समन्वयाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

MAITRI Cell मार्फत तक्रारींची नोंद, संबंधित विभागाकडे पाठविणे, विभागांशी समन्वय साधणे आणि प्रकरणाच्या प्रगतीचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.

‘तक्रार नोंदविण्यापेक्षा निकाल महत्त्वाचा’

उद्योजकांसाठी ही व्यवस्था निश्चितच सकारात्मक आहे. मात्र उद्योग क्षेत्राची खरी अपेक्षा केवळ तक्रारींची नोंद नव्हे, तर त्यांच्या कालबद्ध आणि परिणामकारक निराकरणाची आहे.

पुण्यासारख्या राज्यातील प्रमुख औद्योगिक जिल्ह्यात परवानग्या, प्रशासकीय विलंब, विभागांमधील समन्वयाचा अभाव आणि प्रलंबित प्रकरणे यामुळे उद्योगांना अनेकदा वेळ व आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे नव्या तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक तक्रारीसाठी निश्चित कालमर्यादा, जबाबदार विभाग आणि कार्यवाहीचा स्पष्ट ट्रॅकिंग मेकॅनिझम निर्माण होणे आवश्यक असल्याची अपेक्षा उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Ease of Doing Business ला नवी दिशा मिळणार?

‘Ease of Doing Business’ ही केवळ धोरणातील संकल्पना न राहता प्रत्यक्ष प्रशासनात दिसली पाहिजे. त्यासाठी उद्योजकांच्या तक्रारींवर एकाच बैठकीत संबंधित सर्व विभागांना समन्वयाने निर्णय घेण्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारामुळे आता पुणे जिल्ह्यातील उद्योजकांना त्यांच्या समस्या थेट जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी एक अधिकृत आणि केंद्रीकृत व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

या उपक्रमाचे खरे यश पुढील काही महिन्यांत किती तक्रारी निकाली निघतात, किती प्रकरणांमध्ये विभागांना निश्चित कालमर्यादा देण्यात येते आणि उद्योजकांना प्रत्यक्ष दिलासा मिळतो, यावर ठरणार आहे.

औद्योगिक संघटनांची भूमिका महत्त्वाची

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांनी आपल्या सदस्य उद्योजकांच्या समस्या एकत्रित करून योग्य स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेषतः विविध विभागांकडे दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे, परवानग्यांमधील विलंब, विभागीय समन्वयाचा अभाव आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी या नव्या व्यासपीठावर मांडता येणार आहेत.

उद्योजकांसाठी संपर्क

उद्योजकांच्या तक्रारी आणि समस्या पुढील कार्यालयात सादर करता येतील:

Industry Grievance Redressal Cell
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, पुणे

दूरध्वनी: ०२०-२६१३००९७
ई-मेल: collector.pune@maharashtra.gov.in

UdyogNews.in चे मत

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा उपक्रम स्वागतार्ह आहे. मात्र उद्योजकांसाठी खरी ‘Ease of Doing Business’ तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा तक्रारींवर बैठका होण्याबरोबरच प्रत्येक प्रकरणाला स्पष्ट कालमर्यादा, जबाबदारी आणि अंतिम निकाल मिळेल. आता उद्योग क्षेत्राचे लक्ष १३४ प्रलंबित तक्रारींपैकी किती तक्रारी किती वेळेत मार्गी लागतात, याकडे असेल.

#पुणे #उद्योजक #उद्योग #तक्रारनिवारण #MAITRI #EaseOfDoingBusiness #PuneIndustries #UdyogNews #IndustrialDevelopment

📰 ताज्या बातम्या

आजची मुख्य बातमी

उद्योजकांसाठी ‘वन-स्टॉप’ दिलासा! पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण कक्ष व MAITRI Cell कार्यान्वित !DISH Pune

दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी उद्योजकांच्या समस्यांवर विशेष सुनावणी; पहिल्याच बैठकीत १३४ प्रलंबित तक्रारींचा आढावा पुणे |…

आजची मुख्य बातमी

चाकण-भोसरीत २३२०.९७ कोटींची औद्योगिक झेप!

४९ MSME उद्योगांसोबत सामंजस्य करार; ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग आणि प्रिसिजन क्षेत्राला मोठी चालना पुणे | उद्योगन्यूज प्रतिनिधी चाकण-भोसरी औद्योगिक…

ताज्या घडामोडी

अपघातमुक्तीसाठी रांजणगावातील तज्ज्ञ मार्गदर्शनातून पुण्यासाठी महत्त्वाचा सुरक्षा संदेश, #DISH

रांजणगावातील या उपक्रमातून पुणे जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा संदेश समोर येतो—औद्योगिक क्षेत्रातील अपघात रोखण्यासाठी केवळ सुरक्षा…

ताज्या घडामोडी

भोसरीतील गैलेक्सी इंडस्ट्रीजला भीषण आग, Galaxy Industries Fire 🔥

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी भोसरीतील गोलेक्सी इंडस्ट्रीजमध्ये आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी भोसरी, इंद्रायणी…

आजची मुख्य बातमी

चाकणच्या कचरा प्रश्नावर PMRDAचा ३६.५ एकरांचा प्रकल्प; पण प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार?

चाकण परिसराची कचराकोंडी फुटली! ♻️ ३६.५ एकरांवर उभारणार PMRDAचा मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प चाकण औद्योगिक वसाहत आणि परिसरातील…

ताज्या घडामोडी

🔥 MIDCच्या गेटबाहेरही आग धोक्यात! चाकण–भोसरीत Fire Safetyचा खरा सवाल: कागदावरची Compliance कोण तपासणार आणि MIDCबाहेरील उद्योगांचे काय?

हजारो उद्योग, लाखो कामगार आणि आग लागल्यावरच यंत्रणा जागी होणार का? UdyogNewsच्या तपासणीत कायदा, उद्योगांची जबाबदारी आणि प्रशासनाच्या…

लोकल जाहिराती

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांचा पर्यावरणीय संघर्ष तीव्र; माळशेज-मोरांडे पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून आंदोलन

पुणे | उद्योगन्यूज विशेष पुणे जिल्ह्यात मोठ्या पायाभूत आणि ऊर्जा प्रकल्पांची संख्या वाढत असताना त्यांचे पर्यावरणीय परिणाम, स्थानिक…

आजची मुख्य बातमी

चाकण MIDCच्या समस्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन; आता उद्योगांना प्रत्यक्ष प्रतिसादाची अपेक्षा ! Dedicated Helpline जाहीर Mobile 9322097092 whatsapp प्रतिसाद मिळेल का पाहणे गरजेचे!

चाकण MIDCच्या समस्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन; आता उद्योगांना प्रत्यक्ष प्रतिसादाची अपेक्षा MIDCच्या नव्या सुविधेचे स्वागत; UdyogNews.in ठेवणार अंमलबजावणीवर लक्ष…

उद्योगांची यशोगाथा

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांत भारताची नवी बांधकाम क्रांती ! मातीच्या विटांपासून ‘ग्रीन बिल्डिंग’कडे… AAC Blocks एका तरुण उद्योजकाची ‘शून्यातून उद्योग उभारण्याची’ कहाणी ! #Alpine Buildtech

उद्योगन्यूज | स्वातंत्र्यदिन विशेष भारताने १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळवले तेव्हा देशासमोर केवळ राजकीय स्वातंत्र्याचे नव्हे, तर स्वावलंबी आणि…

कायदे व सुरक्षा

MPCB Consent Renewal : 120 दिवसांचा नियम आणि विलंब शुल्क — उद्योगांसाठी महत्त्वाची माहिती

2025 पासून लागू असलेल्या नियमांची माहिती | अधिकृत GR / Circular PDF डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

आजची मुख्य बातमी

चिखलीच्या ताम्हाणे वस्तीत कंपनीमधील भट्टीचा स्फोट; निवासी भागातील धोकादायक उद्योगांवर कारवाई कधी? PCMC आणि DISH विभागाला नागरिकांचा थेट सवाल !

UdyogNews.in | नागरिकांचा सवाल : अजून किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? चिखली : चिखलीतील ताम्हाणे वस्ती येथील…

Blog

मुळा-मुठा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा व प्रत्यक्ष पाहणी !

११ ऑगस्ट २०२६ रोजी जलशक्ती मंत्रालयाच्या NRCD विभागाचे मा. संयुक्त सचिव श्री. झैगम अली खान यांच्या अध्यक्षतेखाली मुळा-मुठा…

ताज्या घडामोडी

GeM पोर्टलच्या वापरात पुणे आघाडीवर; उद्योगांना सरकारी खरेदीत थेट बाजारपेठेची मोठी संधी !UdyogNews.in विशेष

पुणे : UdyogNews.in विशेष | सरकारी खरेदीच्या डिजिटल क्रांतीत पुण्याच्या उद्योगांसाठी नवी दारे सरकारी विभागांना माल व सेवा…

लोकल जाहिराती

Pune Scientists Explore a New Route to Break Down Polyurethane Plastic — A Potential Opportunity for Circular-Economy Startups !

PUNE: A new research direction emerging from Pune could open an important pathway for the treatment and recycling…

आजची मुख्य बातमी

MULLER-BBM ACOUSTIC कंपनीकडून प्रदूषण नियमांचे उल्लंघन;MPCB आता कारवाई करणार का?

स्थानिक नागरिकांकडून कारवाईची मागणी ध्वनी व वायू प्रदूषणाचा आरोप; शाळा, रुग्णालये व रहिवासी क्षेत्रापासून अंतराच्या नियमांचाही प्रश्न पिंपरी,…

Advertisement Gas

🎨 आजचे व्यंगचित्र

MIDC

आमचे उद्दिष्ट आणि बांधिलकी

अचूकता: आम्ही केवळ खात्रीशीर आणि अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या बातम्या प्रसिद्ध करतो.

स्थानिक प्राधान्य: आमचे संपूर्ण लक्ष पुणे, चाकण, भोसरी आणि PCMC च्या स्थानिक औद्योगिक प्रश्नांवर आहे.

डिजिटल क्रांती: औद्योगिक जगतातील माहिती वृत्तपत्राच्या आधी डिजिटल माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणे.

📝 तुमची बातमी पाठवा (Submit News)

Send your Industrial news with images, CSR news at Editor@UdyogNews.in

कायदे व सुरक्षा

MPCB Consent Renewal : 120 दिवसांचा नियम आणि विलंब शुल्क — उद्योगांसाठी महत्त्वाची माहिती

2025 पासून लागू असलेल्या नियमांची माहिती | अधिकृत GR / Circular PDF डाउनलोड करण्यासाठी खालील...

कायदे व सुरक्षा

🚨DISH चे नाव आणि अधिकाऱ्यांची पदनामे बदलली – महाराष्ट्र शासनाचा नवा GR जारी !कारखाना परवाना (Factory License) विभागात मोठा बदल

महाराष्ट्र शासनाने दि. 27 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी करून “औद्योगिक सुरक्षा...

कायदे व सुरक्षा

टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे

टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे

महत्त्वाचे शासकीय पत्ते आणि संपर्क (Emergency Directory)

MPCB प्रादेशिक कार्यालय, पुणे

जोगस सेंटर, ३ रा मजला, वाकडेवाडी, मुंबई-पुणे रस्ता, पुणे - ४११००३

MIDC प्रादेशिक कार्यालय (PCMC)

उद्योग भवन, गणेशखिंड रस्ता, पुणे - ४११००७

मुख्य फॅक्टरी इन्स्पेक्टर ऑफिस

कामगार भवन, शिवाजीनगर, पुणे (औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय)

नवीन अपडेट्स लवकरच येत आहेत...

शासकीय निर्णय आणि जीआर (Govt GR & Policies)

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आणि कामगार विभागाचे सर्व नवीनतम शासन निर्णय (GR) डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक्स.

नवीन कर रचना, एमएसएमई (MSME) साठीच्या सबसिडी आणि उद्योगांसाठीच्या विशेष सवलतींची अधिकृत परिपत्रके.

नवीन प्रकल्प आणि रोजगाराच्या संधी (Jobs & Openings)

चाकण, भोसरी आणि तळेगाव परिसरातील मॅन्युफॅक्चरिंग व आयटी पार्क (Hinjewadi) क्षेत्रातील गुंतवणुकीचे ताजे आकडे आणि रोजगाराच्या संधी.

आयटी (ITI), डिप्लोमा, इंजिनिअर्स आणि अनुभवी अधिकाऱ्यांसाठी औद्योगिक पट्ट्यातील लेटेस्ट जॉब अपडेट्स आणि करिअर मार्गदर्शन.